हडपसर सय्यदनगर मधील गुन्हेगार पच्चीसवर गोळीबार करणाऱ्या विराज यादव, यश ससाणे व त्याचे इतर साथीदार यांचेविरूध्द मोक्का दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

५ जून २०२३ रोजी ससाणे वस्ती , मोहमंदवाडी रोड , हडपसर पुणे येथे सार्वजनिक रोडवर फिर्यादी पच्चीस व त्याचे मित्र असे मोटार सायकलवरुन चहा पिण्यासाठी गुलामअली नगर येथे जात असताना,त्यांचेशी जुना वाद असल्याने यश सुनिल ससाणे , रा . गल्ली नंबर १५ , सैय्यदनगर , पुणे हा गाडीवर त्याचे मित्रासह येवुन , फिर्यादी यांचे बाजुने कट मारुन पुढे काही अंतर जावुन,आज तेरा मैं गेम बजाता हूँ असे म्हणून त्याने त्याचा शर्ट वर करून , त्याचे कमरेला लावलेले पिस्टल काढून , फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सदर पिस्टल मधुन फिर्यादी यांचे अंगावर दोन राउंड फायर करुन दहशत करीत निघून गेले .त्याबाबत फिर्यादी यांनी नमुद इसमां विरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि . नं . २५८ / २०२३ , भा.दं. वि . कलम ३०७ , १२० ( ब ) , २१२ , १०८ , १० ९ , २०१ , ३४ , क्रिमी अॅमेन्डमेंट अॅक्ट कलम ७ , भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान नामे १ ) विराज जगदिश यादव , वय -२५ वर्षे , रा . आदित्य रेसिडेन्सी फ्लॅट नं . १०४, हांडेवाडी रोड,आनंदनगर , हडपसर , पुणे ( टोळी प्रमुख ) २ ) यश सुनिल ससाणे , वय -२२ वर्ष , रा.सैय्यदनगर गल्ली नं . १५ / ए , महंमदवाडी रोड , हडपसर पुणे ३ ) चेतन बाळू जाधव , वय – २१ वर्ष रा . अमित हाईटस सोसायटी , अपेक्षा पॅलेस बिल्डिंग , ससाणेनगर , हडपसर , पुणे ४ ) गुफ्या ऊर्फ गुफरान ऊर्फ मतीन फिरियाज खान , वय – २१ वर्षे , रा . गल्ली नं . १५ / ए , सय्यदनगर , महंमदवाडी रोड , हडपसर , पुणे ५ ) गुलाम गौस मुस्तफा खान , वय २१ वर्षे , रा . गल्ली नं . २३ / ए , सय्यदनगर , महंमदवाडी रोड , हडपसर , पुणे ६ ) अक्षय नागनाथ कांबळे वय -२३ वर्षे रा . ससाणेनगर लेन नं , १५ , हडपसर , पुणे , ७ ) अथर्व नंदु शेंडगे , वय – २० रा . स.न. १५ , विठ्ठलनगर मांजरी फाटा , हडपसर, असे मोक्का दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

तर यश ससाणे व गुफया उर्फ गुफरान मतीन खान हयंना अटक करण्यात आली असून बाकिचे आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.विराज जगदिश यादव त्याने त्याचे साथीदारासह स्वतःचे टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण व्हावे व त्यातुन गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळविणेकरीता गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here