पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, सगळीकडे बेकायदेशीर धंदे बंद असताना येरवड्यात चालू असलेल्या धंद्यावर पोलीसांनी छापा घातला आहे. सिद्धार्थ नगर मच्छिमार्केटच्या पाठीमागे,कबुतर बिल्डींग येरवडा येथे बेकायदेशीर जुगार खेळत व इतरांना खेळवित असलेबाबतची गोपनिय माहीती पोलिसांना प्राप्त झाली,
पोलीस उपनिरीक्षक पंढरकर सामाजिक सुरक्षा विभाग व पोलीस अंमलदार स्टाफ असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता १)शंकर शेट्टी रा. ताडीवाला रोड पुणे,२)अजय गायकवाड रा. येरवडा पुणे, ३) कुमार सोनवणे रा येरवडा हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे सोरट व कल्याण मटका जुगार चिठ्यावर घेत असताना १) रविंद्र भगत रा येरवडा, २) हरिचंद्र धोत्रे, ३) विश्वनाथ सपकाळ रा चिंचवड पुणे ४) पांडुरंग लोखंडे रा येरवडा पुणे ५) विलास शिंदे, हे जुगार खेळताना मिळून आले,
त्यांच्याकडील एकूण ५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ), अन्वये येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग,तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, बाबा कर्पे,आण्णा माने ,प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे,संदिप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण,प्रताप कदम यांनी केली आहे.