पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे शहरातील एका शाळेत घूसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नरादामाला चोवीस तासांच्या आत पोलीसांनी अटक केली आहे. जे.एम.रोड येथील गर्ल्स हायस्कुल मध्ये शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीस एका अज्ञात इसमाने ओळख असल्याचा बहाणा करुन तीचेवर शारिरीक अत्याचार करून,
बाहेर कोणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन निघुन गेला.याबाबत पिडीत मुलीचे आईने अज्ञात इसमाविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणेस तक्रार दिल्यानंतर भादवि कलम ३७६, ३४१, ५०६,पोस्का कायदा कलम ३,४,७,८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा, अतीसंवेदनशिल असल्याने सदर गुन्हयाचे घटनास्थलास डॉ.रविंद्र शिसवे,सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रियंका नारनवरे पोलीस उप- आयुक्त,परिमंडळ-श्रीनिवास घाडगे, पोलीस उप-आयुक्त, सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त,विश्रामबाग विभाग यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.
सदर गुन्हयातील आरोपी हा अज्ञात असलेने वरीष्ठांनी युनिट-१ कडील अधिकारी व अंमलदार यांना दाखल गुन्हयाचा समातंर तपास करुन, गुन्हयातील अज्ञात नराधमाचा शोध घेवुन,त्यास जेरबंद करण्याबाबत आदेशित केले होते.
अज्ञात इसमाचा शोध घेत असताना,सदर शाळेतील व परीसरातील तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहीती मिळवुन,त्याची पडताळणी करुन,शाळेतील मुलींच्या सांगण्यावरुन यातील अज्ञात इसमाचा तपास करुन अखेर सदर गुन्हयातील आरोपीस पकडण्यात युनिट-१ चे पथकास यश आले.
मंगेश तुकाराम पदमुले,वय-३६ वर्षे रा.२६१, पांडवनगर,पुणे मुळगाव- मु.पो. आजगणी,ता.जि.रत्नागिरी असे आरोपीचे नाव आहे. पदमुले हा सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. नराधमास पुढील कार्यवाही करण्याकरीता शिवाजीनगर पोलीस ठाणेचे स्वाधीन करण्यात आलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक,शैलेश संखे, पोउप-निरी.सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार,सतीश भालेकर, विजेसिंग वसावे, महेश बामगुडे, अशोक माने, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, राहुल मखरे, अमोल पवार शशीकांत दरेकर,अनिकेत बाबर, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, मिना पिंजण यांनी केली आहे.