खडक पोलिसांच्या नाकाखाली सुरू होता जुगार अड्डा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारला, आणि त्यानंतर पुण्यातील अवैध धंदे बंद म्हणून आदेश काढले, परंतु काल खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे खडक पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर मोठा गाजावाजा करून जुगार अड्डा सुरू होता. परंतु खडक पोलिसांना या बाबतीत माहिती नव्हते का? गुन्हेगारांची कुंडली जमा करून ठेवणारे खडक पोलिस, मात्र जुगार अड्डे बंद करण्यासाठी कडक राहिले नाही?
शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ६० जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
नंदू नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर हे जुगार अड्डे काही दिवस बंद राहतात. त्यानंतर पुन्हा सुरु होतात. शुक्रवारी पोलिसांनी ज्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्टमध्ये धाड टाकून २ लाख रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर आता हा जुगार अड्डा पुन्हा सुरु असल्याचे आढळून आले. नंदू नाईक याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
गुन्हे शाखेने घातलेल्या या छाप्यात पोलिसांनी ६० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ लाख २५० रुपये रोख, ४७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अतिमेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथके, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथ, युनिट १ व ५ च्या पथकाने केली आहे.