एम.आर.टी.पी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी.
या अनधिकृत बांधकामाला अभय कोणाचा?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढव्यातील मिठानगर येथील राजीव गांधी शाळे शेजारी भररस्त्यात बेकायदेशीरपणे बांधकाम चालू आहे. परंतु कोणाच्या तरी आशिर्वादानेच काम चालू असल्याचे बोलले जात आहे. पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी सदरील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवून, सदर ठिकाणी चालू असलेल्या बांधकामाच्या स्लॅबला होल मारण्यात आले होते.
परंतु काही दिवस उलटताच पुन्हा बेकायदेशीर बांधकाम चालू झाले. पुणे सिटी टाईम्स ने नागरिकांचे जीव धोक्यात घालून पुन्हा बेकायदेशीर बांधकाम चालू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदरील बांधकामावर दुसऱ्यांदा कारवाई केली.परंतु सदरील कारवाई करताना फक्त ४ होल मारून मोकळे झाले.
याचाच अर्थ अधिकाऱ्यांना सुध्दा बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्याचा नुकसान करायचा नव्हते? तसेच त्या बांधकामावर पुर्ण कारवाई का केली जात नाही असा प्रश्न देखील आजूबाजूच्या लोकांनी विचारला आहे.
आणि विषेश म्हणजे पारगे नगर मधील एका बांधकामावर दोन तीन वेळा कारवाई होते आणि त्या सोबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील गुन्हा दाखल करण्यात येतो. परंतु हे बांधकाम थांबविण्याची हिम्मत पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही? या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची आज भेट घेऊन कारवाईची मागणी केली जाणार आहे.