पुणे : कोंढव्यातील माजी नगरसेवकांच्या हितचिंतकाने सोडली साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने कोंढवा भागातील राजकारण तापू लागले आहे. पुणेकरांचे लक्ष कोंढव्याकडे लागले आहे. त्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकेकाळी माजी नगरसेवकांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या व्यक्तीने ऐनवेळी साथ सोडल्याने कोंढवा भागात खळबळ उडाली आहे.

इम्तियाज शेख हे तीनही माजी नगरसेवकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. काही कारणांमुळे त्यांच्यात मध्यंतरी वाद झाल्याचे दिसून आले होते. त्याची चर्चा संपूर्ण कोंढवा भागात रंगली होती. अखेर कट्टर मैत्रीचा हात सोडून इम्तियाज शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

इम्तियाज शेख यांनी साथ सोडल्याने त्या तिघांना कितपत फरक पडणार, हे येणाऱ्या काही दिवसांतच समजेल. तर दुसरीकडे, इम्तियाज शेख यांनी त्या तिघांना पाडण्यासाठी रणनीती आखली असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here