भवानी पेठ क्षेत्रीय प्रशासनाचे व पोलिसांचे दुर्लक्ष?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
वापर विना पडलेल्या मार्केटला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने लाखो रुपयांची उधळपट्टी करून दारूडयांना चांगलेच मोकळे रान करून दिले आहे.पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जुना मोटार स्टॅन्ड येथे भवानी पेठ भाजी मार्केट म्हणून कित्येक तरी वर्षा पासून मार्केट अस्तित्वात आहे.

ते भाजी मार्केट विना वापर पडून राहून ही मार्केटवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने सन १७ ते आजतागायत लाखो रूपयांची उधळपट्टी करून स्वहित जपल्याचे बोलले जात आहे. जे मार्केट भाडयाने देण्यात आल्याचे बोलले जात असले तरी आजरोजी एकदाही स्थानिक नागरिकांना भाजी विक्रेते भाजी विकताना दिसून आलेले नाही.उलट भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने ५ वर्षात अंदाजे ३० ते ४० लाख रुपये खर्च केल्याची चर्चा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात रंगली आहे.
मार्केट मधील भाजी विक्रेते त्या जागी अस्तित्वात नसताना लाखो रुपये खर्च का झाले? हा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. लाखो रुपये खर्च करून त्याठिकाणी भाजी विक्री होत नसल्याने दारू पिण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या हाती आला आहे. दारूडयांवर पोलिसांचा हिसका देखील कमी पडला आहे. बंद पडलेल्या भाजी मार्केटवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ( क्रमक्षा )