अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार व्हिडिओ पुरावा
पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी,
पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केल्याने हुक्का पार्ट्या आता शहराबाहेर जोरात सुरू आहेत. मात्र ग्रामीण पोलीस दलाच्या दुर्लक्षामुळे बापदेव घाट परिसरात हुक्का पार्लर बिनधास्त चालू आहेत. येथे थेट १६-१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांना हुक्का दिला जात असल्याचे उघड झाले आहे.

‘पुणे सिटी टाइम्स’च्या प्रतिनिधींनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडिओ चित्रीकरण केले असता, बाबदेव घाट संपल्यानंतर लगतच्या ‘बिलियन हॉटेल’मध्ये अल्पवयीन मुले हुक्का ओढताना दिसले. या हॉटेलमध्ये हुक्का पार्टी जोरात सुरू असते. विशेष म्हणजे, या हॉटेलच्या भागीदारीत पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळेच स्थानिक पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.तर सदरील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे स्वारगेट, मार्केटयार्ड येथे बेकायदेशीर धंदे असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणातील सर्व व्हिडिओ पुरावे ‘पुणे सिटी टाइम्स’तर्फे हिवाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले जाणार आहेत. तसेच बिलियन हॉटेलवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. क्रमशः



