कोंढवा प्रभाग क्रमांक १९ मध्ये काशिफ सय्यद यांची चर्चा
नवीन चेहऱ्याला मतदारांची पसंती
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असल्याने आता भावी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. सामाजिक कार्यातून केलेल्या कामाची जबाबदारी घेत, आता एक पाऊल पुढे टाकत नगरसेवकपद खेचून आणण्यासाठी ते तत्पर झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा-कौसरबाग) मधून नवीन चेहरा म्हणून काशिफ सय्यद उदयास आले आहेत.

कोंढव्यात काशिफ सय्यद यांनी रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेज लाइन, विजपुरवठ्यातील खंडितपणा यासारख्या अनेक समस्यांवर चांगल्या प्रकारे काम केले आहे. गरिबांचा कैवारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.

ते शिक्षित असल्याने तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे. कोंढव्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही काशिफ सय्यद यांनी व्यक्त केला आहे.



