पुणे : कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकामावर पालिकेची धडक कारवाई.

0
Spread the love

कलीम शेख, राजू शेख, जिलानी शहा व इतरांच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढव्यात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.‌ बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे. शासनाची व नागरिकांची फसवणूक करून बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

याचीच दखल घेत पुणे महानगर पालिका बांधकाम विकास विभाग झोन २ कडून कारवाई केली जात आहे. दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी कोंढवा खुर्द शिवनेरीनगर गल्ली नंबर ३ नंबर मध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम केले जात असल्याची बातमी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.

त्याची दखल घेत पुणे महानगर पालिकेने सदरील बांधकामांवर कारवाई केली आहे. तर संत ज्ञानेश्वर नगर काकडे वस्ती सर्वे नंबर ५ , कोंढवा बुद्रुक येथील २ इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here