पुणे : ‘तू व्याजाने पैसे देतेस, हे तुझ्या पतीला सांगतो,आक्का बहुत डेंजर है, महिलेला धमकावून ६ जणांनी घेतले ८६ तोळे सोन्याचे दागिने लुटले

0
Spread the love

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुण्यातील उपनगरातील कोंढव्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.तू व्याजाने पैसे देतेस, हे तुझ्या पतीला सांगतो, तुझ्या मुलीला उचलून नेतो, आक्का बहुत डेंजर है, तूला जिवंत सोडणार नाही, असे ६ जण एका महिलेला तब्बल २ वर्षे धमकावत होते. या काळात तिच्याकडून घरातील ८६ तोळे सोन्याचे दागिने, २३ लाख रुपये ऑनलाईन व रोख रक्कम घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिठानगर येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी १) झकिया मुल्ला रा. शेरखान चाळजवळ, मिठानगर, कोंढवा, २) आयशा अली सिद्दीकी, ३) आसिया जवाद अली रा. आजमेरा पार्क, कोंढवा, ४) बिलकीस कमील शेख रा. मार्वेल अॅलबेरो, कोंढवा, ५) अमिन नासीर सिद्धीकी, रा. कोंढवा खुर्द, ६) रजिया शेख रा. कोंढवा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी या एकत्र कुटुंबात राहतात. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून १७ हजार रुपये व्याजाने घेतले होते. या पैश्यांची परतफेड व व्याज म्हणून तू आमचेकडून व्याजाने पैसे घेतले आहेत, असे तुझ्या पतीला सांगतो, अशी या महिलेला त्यांनी धमकी दिली. तिच्याकडून काही रोख रक्कम घेतली. त्यानंतर फिर्यादी हिच्या लहान मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच आक्का बहुत डेजंर है, असे म्हणून तुला ते जिवंत सोडणार नाही अशी वारंवार धमकी दिली.

तिला भिती घालून तिच्याकडून घरातील ८६ तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच वेळोवेळी २३ लाख रुपये ऑनलाईन व रोख रक्कम घेतली. घराची कागदपत्रे, सासरे यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, चेक बुक इत्यादी कागदपत्रे घेतली. सोन्याच्या दागिन्यांपैकी काही सोन्याचे दागिने हे ज्वेलर्सकडे गहाण ठेवून त्याचेवर पैसे उचलले.

त्याच्या व्याजाची रक्कमही फिर्यादीकडून घेतली आहे. घरातील सोन्याचे दागिने दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here