वसुली बहाद्दर तडकाफडकी निलंबित, पोलिस दलात उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पोलिसांचे अब्रूचे लक्तरे वेशीवर टांगून पोलिसच अवैध धंद्यात पार्टनरशीप करत असल्याचे अनेक प्रकरणं आहेत. जे नागरिकांना सर्व माहित आहे. परंतु पोलिस खात्यातून नागरिकांचे नाव बाहेर दिलं जात असल्याने सध्या टिप देणखरे गप्प बसलेत? अनेक अवैध धंद्यात पार्टनरशीप मध्ये पोलिसांचे नाव आज नाही तर उद्या किंवा रिटायर झाल्यावर ऐकायला येतेच की,
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची वसुली करणारा बहाद्दरच एका प्रकरणात गोवला गेला आहे.गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पुणे सातारा रोडवर पदमावती येथे ५ किलो गांजा जप्त केला. जप्त दरम्यान पोलिसांनी त्या विक्री करणाऱ्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिस अंमलदाराचा नाव पुढे आला आहे.
या गांजा व्यवसायात भागीदार असलेला पोलीस अंमलदार नवनाथ शिंदे उर्फ नवा शिंदे उर्फ NB याला पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्याला निलंबित करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नवनाथ शिंदे हा सध्या स्वारगेट पोलीस ठाण्यात नियुक्त होता. तो सहकारनगर परिसरात वसुलीचे काम करत होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक खरात, सहायक पोलीस फौजदार शेख, चालक पोलीस अंमलदार जामगे व इतर अंमलदार यांनी पेट्रोलिंग करीत असताना पदमावती येथे प्रतिक पवार याच्या ताब्यातून ५ किलो २६० ग्रॅम गांजा विक्री करत असल्याचा व बाळगताना मिळून आला. हा गांजा मालक सौरभ कट्टीमणी ऊर्फ पाटील व भागीदार सागर चव्हाण ऊर्फ डागा भाई, मॅनेजर अभिजित सावंत यांचे मार्फत प्रतिक पवार व कामगार सॅण्डी ऊर्फ संदिप घोटे यांना विक्रीसाठी वाहतूक करुन देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कारवाई करण्यापूर्वी एक संदेश प्राप्त झाला होता. त्यात सातारा रोडवर गांजा विक्रीचा मोठा व्यवसाय सुरु आहे. सौरभ कट्टीमणी आणि डोंग्या भाई हे काम करत आहेत. त्यांना एक पोलीस अंमलदार हा मदत करत आहे. तो पोलिस हा सहकारनगर पोलीस ठाण्याचा कलेक्टर म्हणजे वसुली करतो. तो या गांजा व्यवसायात भागीदार असल्याची चर्चा आहे. हा पोलीस त्याच्या हद्दीत स्पा, मटका क्लब असे सर्व प्रकारचे अवैध धंदे चालवत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
या कारवाईत ताब्यात घेतलेल्या प्रतिक पवार याला विचारल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये त्या पोलिसाचा नंबर NB या नावाने सेव्ह केला होता. त्याला तो कोणाचा आहे, असे विचारल्यावर त्याने भाऊ याचा नंबर असून तो सहकारनगर पोलीस ठाण्याची वसुलीचे काम करतो, असे सांगितले. त्याप्रमाणे सौरभ कट्टीमणी याच्याकडून तो पोलिस पैसे घेतो का, असे विचारल्यावर त्याने होकार दिल्याने पोलिस उपायुक्तांनी शिंदेला निलंबित केले आहे.




