सासवड बोपदेव घाटाच्या पुढे “पुष्पाच्या सिंडिकेट” फॅमिली रेस्टॉरंटमध्ये दम मारो दम जोरात.!

0
Spread the love

सिंडिकेटचा पुष्पा म्हणतो झुकेगा नही साला..

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुष्पा या मुव्ही मध्ये तुम्ही पाह्यलं असेलच सिंडिकेट मधला पुष्पा, तसेच आपल्या पुण्याजवळील एका गावात पुष्पाचा सिंडिकेट आहे. म्हणजे तो पुष्पा चंदनाच्या लाकडाची तस्करी करायचा परंतु हा सिंडिकेट पुष्पा हुक्का पार्लर चालवत आहे.

पुणे शहरात सध्यातरी हुक्का पार्टी दुकाने बंद पडली आहे.परंतु बोपदेव घाटाच्या पुढे ” दम मारो दम ” जोमाने सुरू आहे. आमराई भिवरी चतुरमुख रोडवर असलेले सिंडिकेट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ” दम मारो दम ” चालू असून त्यांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही.

बिनधास्तपणे हुक्का पार्टी रंगवली जात आहे. नियमानुसार ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ,जेवणाची सोय असते त्या ठिकाणी नो स्मोकिंग झोन असतो.परंतु सिंडिकेट मधील पुष्पाला पोलिसांचा आशिर्वाद आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. तर त्वरित कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

” हुक्का पार्लर मध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग “

सिंडिकेट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये हुक्का पिताना सोळा सतरा वर्षांतील मुले दिसून आले आहे. सदरील व्हिडिओ कैमेऱ्यात कैद झाला आहे. हुक्का मालक लहान मुलांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळ करत आहे. ही बाब अंत्यंत गंभीर असून पोलिसांनी त्वरित गुन्हे दाखल केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here