हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ( Hadapsar police station news )
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, दिवाळीचा बोनस मागितल्याचा राग आल्याने एका तरुणावर ३ जणांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला आहे.
तुळशीराम शिंदे वय ४० वर्षे रा.हडपसर यांनी फिर्याद दिली आहे.१) तपीन दिलीप विश्वकर्मा वय १९ वर्ष रा.निर्मल टाऊनशिप, पार्किंगमध्ये काळेपडळ हडपसर, २) निरंजन चित्रनाथ योगी वय २२ वर्ष रा.
बिनावत रेसिडन्सि बी विंग पार्किंगमध्ये,काळेपडळ हडपसर ३) शेरबहादुर उर्फ शेरे नवलसिंग विश्वकर्मा वय २० रा.दुर्वा हाईट्स, भेकराईनगर बसस्टॉप मागे फुरसुंगी हवेली या तिघांना अटक करण्यात आली आहे.
सदरील घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री ग्लायडिंग सेंटरचे पश्चिमेस फिर्यादी यांचा भाऊ सिताराम खंडु शिंदे वय ३५ वर्षे रा.गणपती मंदिराजवळ,
काळेपडळ हा यातील नमुद इसम यांना दिवाळी बोनस मागत असल्याच्या कारणावरुन आरोपींनी चिडुन जाऊन त्याचे गळयावर पाठीवर,पोटावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप गायकवाड करीत आहेत.