पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहरातील पुरवठा निरिक्षकांचे बऱ्याच वर्षापासून बढती थांबविण्यात आली होती. बढती मिळण्यासाठी पुरवठा निरीक्षकांनी बराच खटाटोप केला होता. तर काही निरीक्षकांनी बढतीसाठी कोर्टात धाव घेतली होती. आज त्या निरीक्षकांना राज्य शासनाने बढती दिल्याने, निरीक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पुरवठा निरीक्षक आता परिमंडळ अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. विजयकुमार महादेव क्षीरसागर यांची ” ब ” परिमंडळ कार्यातून बढतीने “अ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती झाली आहे. तर अमोल भागवतराव हाडे यांची “ह” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे.
चांगदेव कल्याण नागरगोजे यांची येरवडा येथील ” ई ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती झाली आहे. पल्लवी मुरलीधर सपकाळे यांची ” म ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती झाली आहे. वषिसठ नागनाथ पांचाळ यांना ” ग” परिमंडळ अधिकारी आहे त्या ठिकाणीच बढती देण्यात आली आहे.
प्राजक्ता माळी यांची ” ल ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. तर कृष्णा चिंतामणी जाधवर यांची आहे त्या ठिकाणी म्हणजे ” ड ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. स्नेहा दिनकर इंगळे यांना ” ब ” परिमंडळ अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे.
प्रदिप अप्पाजी डंगारे यांनी “ज” परिमंडळ अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. सुशांत साहेबराव ओव्हाळ यांना “क” परिमंडळ अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. आता हे सर्वजण परिमंडळ अधिकारी ( नायब तहसीलदार) म्हणून कामकाज करणार आहे.