पुण्यात खुनाचे सत्र सुरूच.! ५ अल्पवयीन मुलांनी केला खून, परिसरात मोठी खळबळ.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरात काही खुनाचे सत्र थांबते थांबेना. काही दिवसांपूर्वी मंगला टॉकीज समोर टोळक्याने एकाचा खून केला होता. त्यानंतर पुन्हा काही दिवसाने सय्यदनगर मध्ये खूनाची घटना घडली. तर आता पुन्हा काळेपडळ भागात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना शनिवारी पहाटे एकच्या सुमारास काळेपडळ येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे.महादेव रघुनाथ मोरे वय-२५ रा. काळेपडळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घतले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here