पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकासहीत २ पोलिस निरीक्षकांचे बदली आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक विनायक दौलतराव गायकवाड यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गणपतराव कुंभार यांची विशेष शाखेत पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्ष अश्विनी अनिल सातपुते यांची अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.