दोन वर्षाकरीता तडीपार केलेला गुन्हेगार वसिम फक्रुददीन शेख जेरबंद,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, दोन वर्षाकरीता तडीपार केलेला गुन्हेगार वसिम फक्रुददीन शेख जेरबंद करण्यात आले आहे. ११ मार्च २००९ साली रात्रीचे सुमारास व्यंकटेश सुपर मार्केट समोर,लोहीयानगर याठिकाणी फिर्यादी नंदलाल विठठल नाईक वय-४५ रा – सदर यांचे रिक्षाची काच फोडली म्हणुन त्यांनी संशयीत वसिम फक्रुददीन शेख यास शिवीगाळ केली होती.

त्याचा राग मनात ठेवुन त्याने त्याचेजवळील तलवारीने फिर्यादी यांचे डोक्यावर, कपाळावर व हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

जिल्हा व सत्र न्यायाधिश , शिवाजीनगर न्यायालय पुणे यांनी संशयीत वसिम फक्रुददीन शेख यास सात वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावलेली आहे.

आरोपीने त्याविरुध्द उच्च न्यायालयात शिक्षेविरुध्द अपील केले असुन तो जामिनावर सुटलेला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १,यांनी वसिम शेख यास तडीपार आदेश जानेवारीत काढले होते.

शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्राचे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्राचे तसेच पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन हद्दपार केलेले आहे .युनिट – १ गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गुन्हेगार चेकींग करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली, तडीपार असलेला गुन्हेगार वसिम शेख हा त्याचे पत्नीस भेटण्यासाठी लेकटाऊन कात्रज येथील घरी येणार आहे.

अशी बातमी मिळाल्यानंतर पोलीसांनी ,लेकटावुन, कात्रज, या ठिकाणी जावुन सापळा लावुन संशयीत वसीम फक्रुद्दीन शेख वय ३३ वर्षे रा.एस.आर.ए.बिल्डींग, विंग-बी, खोली नं.१२५, पहिला मजला, लेकटावुनजवळ, यास पकडले आहे.

त्यास पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्याचेविरुध्द खडक व कोंढवा पोलीस ठाण्यात जबरी चोरी , खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे यासारखे एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी अभिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त,डॉ. रविंद्र शिसवे सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त,लक्ष्मण बोराटे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार , इम्रान शेख , तुषार माळवदकर , सतीश भालेकर , महेश बामगुडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here