पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी. पुणे गंजपेठ, लोहियानगर येथील पोलीस चौकी समोरच मोठ्ठा खड्डा पडला असतानाही पोलीस चौकीतील व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे.
सदरील खड्डा वळणावरच असल्याने नागरिकांना अंदाज येण्याअगोदरच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषेश म्हणजे लोहियानगर पोलीस चौकी समोरच खड्डा असल्याने स्वत पोलीसांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पोलिसांनी सदरील खड्डा बुजविण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात संपर्क केला तर काही तासांतच सदरील ठिकाणी डांबरीकरण करून खड्डा बुजविला जाईल? परंतु असे होत नसल्याने किरकोळ अपघाताची शक्यता नाकारता येत नाही?
तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तो रोजचचा रस्ता असताना त्यांनी देखील या खड्ड्याकडे दुर्लक्ष केले आहे.
रात्रीच्या वेळी एखादे अपघात झाले तर याला जबाबदार कोण? सदरील अपघाती खड्डा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने त्वरित बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.