पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
एखाद्याचा मुलगा हरवला असेल आणि १२ वर्षा नंतर पोलिस त्याला कुटुंबाच्या ताब्यात दिल्याने त्या आई वडिलांचे मन किती खुष होत असतील.असाच एक चांगली कामगिरी मुंढवा पोलिसांनी केली आहे. मिसिंग इसम संतोष कमलाकर पेठणे, वय ३८ वर्षे, रा. मु. पो. काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा हा आपले राहते गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याचे मनामध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचे निर्माण झाली, परंतू आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची व बिकट, आडाणी आई-वडील, मोल मजुरी करुन उदरनिर्वाह असल्याने कुटूंबाने अभ्यासा करीता पुणे येथे जाणे करीता विरोध केला. काही दिवस पलटून गेली तरी देखील संतोष पैठणे याचे डोक्यातून पुणे येथे जावून अभ्यास करण्याचे खुळ गेले नव्हते. सन २०१२ मध्ये कोणास काहीएक न सांगता संतोष पैठणे हा घरातून निघून पुणे येथे आला, पुणे येथे अर्धवेळ (पार्ट टाईम) काम करुन अभ्यास करण्यास सुरवात केली.
त्यादरम्यान त्याने महाराष्ट्र लोकसेवा तसेच राज्यसेवा अंतर्गत वेगवेगळ्या पदाकरीता वेळोवेळी परिक्षा देखील दिल्या. परंतू स्पर्धा परिक्षामध्ये कोणतीही पोस्ट निघत नसल्याने व वारंवार अपयश येत असल्याने संतोष पैठणे यास नैराश्य आले. सदर काळामध्ये तो उज्वला शिवाजी पवार, रा. रेल्वे ब्रिजच्या शेजारी, कोद्रेनगर, मुंढवा पुणे यांचेकडे सन २०१७ पासून भाड्याने राहण्यास होता.
१५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० चे सुमारास संतोष पैठणे हा राहत्या भाड्याचे रुममधून काहीएक न सांगता निघून गेल्याने मुंढवा पोलीस ठाणेस मिसिंग तक्रार नोंद केली होती. सदर मिसिंगचे तपासामध्ये तांत्रीक विश्लेषन करुन सदर मुलाचा शोध घेणेस पोलीसांना यश आले. सदर मुलाकडे अधिक चौकशी केली असता सन २०१२ मध्ये मुळगाव काटोडा, ता. चिखली,
जि. बुलढाणा येथून कोणास काहीएक न सांगता स्पर्धा परिक्षेकरीता पुणे येथे आलो होतो. परंतू मला स्पर्धा परिक्षेत यश संपादन न झाल्याने नैराश्य आले होते. त्याचे नैराश्य व कुटूंबापासूनचा दुरावा याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुलाचे राहतेगावी सरपंच व आई वडील यांना संपर्क करुन माहिती दिली असता प्रथम त्यांचा सदर माहितीवर विश्वास बसला नाही, त्यांनी वारंवार विचारणा करुन शहानिशा केली. तेव्हा त्यांना मुंढवा पोलीस ठाणेस बोलावून घेतले असता, मिसिंग मुलाचे वडील कमलाकर धोंडू पैठणे, वय ६५ वर्षे,
कांताबाई कमलाकर पैठणे, वय ५८ वर्षे यांनी त्यांचा मुलगा संतोष कमलाकर धोंडू पैठणे यास भेटल्यानंतर ऐकमेकांना पाहून डोळ्यातून आनंद अश्रू आले. सदर बाबत काटोडा गावचे सरपंच प्रदीप ढिगळे, वडील कमलाकर पैठणे, आई- कांताबाई पैठणे व इतर नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले तसेच पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्दल कौत्युक केले आहे.
सदरची कामगिरी,पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५,सहा. पोलीस आयुक्त आश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, राजू महानोर, पोलीस अंमलदार महेश पाठक, दत्ता जाधव, योगेश गायकवाड, हेमंत पेरणे यांनी केली आहे.