बिबवेवाडी,पर्वती,विश्रांतवाडी,वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक होणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील अवैध धंद्ये करणाऱ्यांची आता खैर नाही, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्याची घोषणा केल्याने वसुल बहाद्दरांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरूवारी रात्री पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
त्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्रीच पुणे पोलीस आयुक्तालयातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी पुणे शहरातील सर्वच अवैध धंद्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्यात येणार आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे.
पुणे शहरातील सर्वच अवैध धंद्यावर सर्जिकल स्ट्राइक करणार – पोलीस आयुक्त अमितेश कुमार व्हिडिओ 👇
नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे पुण्यात येताच अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. गुरूवारी रात्रीपासूनच सर्वच ठिकाणचे अवैध धंदे बंद झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगली होती. अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्या दिवशी पासूनच रुद्रावतार धारण केल्यामुळे अनेक समाजकंटकांचे, गुन्हेगारांचे तसेच अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.पुण्यातील अवैध धंदे १०० टक्के बंद होणार असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा व्हिडिओ सोशल माध्यमात फिरत आहे.