अनाधिकृत बांधकामावर अतिक्रमण कारवाई करीत असताना अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा युवकाचा प्रयत्न; गुन्हा दाखल.

0
Spread the love

हेमंत कोळेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (Bharati Vidyapeeth police station news)

पुणे सिटी टाईम्स; प्रतिनिधी. कारवाई थांबवा, आम्ही रस्त्यावर आलो तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देवुन राडा करणा-याला पोलिसांनी अटक केली आहे.

स.नं.३१, अमृतखान,जांभुळवाडी रोड, आंबेगाव -खुर्द, पुणे येथील मोकळ्या जागे मध्ये कोळेकर हे सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकामावर अतिक्रमण कारवाई करीत असताना यातील नमुद आरोपी याने जेसीबी ऑपरेटर कांबळे यांना शिवीगाळ करुन त्यांना मारण्याची धमकी देवुन,

फिर्यादी यांचे समक्ष त्यांचे कार्यकर्त्यांना घेवुन आला आणि म्हणाला,सदरची कारवाई थांबवा आम्ही रस्त्यावर आलो तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देवुन,फिर्यादी कोळेकर यांना धक्का-बुक्की करुन,बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार यांनी आरोपीला बाजुला केले असता, त्याचा साथिदाराने जे.सी.बी. च्या टपावर चढुन,

आरडा-ओरडा करुन,पुणे महानगरपालिका व अधिकारी यांचे नावाने अपशब्द वापरुन,लॅस्टिकच्या बॉटल मध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतुन,माचिसची काडी पेटवुन पोलीसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

सदरील आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा व ३५३,३०९, ३२३,५०४,५०६ इतर कलमा अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here