पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केट मध्ये तुफान राडा.! पार्किंगच्या जागी ताबा मारल्यावरून झाली हाणामारी : मार्केट मधील काही व्यावसायिकांकडे धारधार शस्त्रे असल्याची चर्चा?

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुण्यातील कॅम्प भागात असलेले फॅशन स्ट्रीट मार्केट हे अनेक युवकांना आणि युवतींना भोवळ घालणारे मार्केट आहे. या मार्केटमध्ये एका दिवसात जवळपास दहा हजार पेक्षा अधिक ग्राहकांची खरीदारी असते. त्या ठिकाणी व्यवसायिकांकडील असलेले कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत? अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यातच १० ऑगस्ट गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून पार्किंगच्या जागेमध्ये ताबा मारल्या वरून वादावाद सुरू झाली.

एका व्यावसायिकाने त्याच्या पार्किंगच्या लगत असलेल्या दुकानाच्या मागच्या बाजूस म्हणजेच पार्किंग मध्ये एका इसमाने जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्या व्यावसायिकाने त्याला त्याच्या जागेवर काहीही ठेऊ नका असे सांगीतले परंतु त्याचे काहीच न ऐकता त्याला एक चापट मारून त्याला चाकू काढून मारणार होता तेवढ्यात व्यावसायिकाला वाचवण्यासाठी काहींनी मध्यस्थी करून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

हे वादावाद अक्षरशः हत्यारे काढण्यापर्यंत पोहोचली. काहींनी त्या वादात धारदार शस्त्रे देखील आणले असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच या ठिकाणी असलेले कामगार ह्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. याबाबत त्याठिकाणी असलेल्यापैकी एकाने हा प्रसंग व्हिडीओ मध्ये कैद करून घेतला आहे.

या व्हिडीओ मध्ये चाकू आणण्यासाठी बोलत असल्याचे ऐकू येत आहे. तसेच या व्हिडिओत जीवे मारण्याच्या धमकी देखील दिले असल्याचे ऐकू येत आहेत. यात लष्कर पोलिस काय करत होते. हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here