BREAKING NEWS पुणे सिटी टाइम्स इम्पॅक्ट :  कोंढवा अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉल फ्युचर फाउंडेशनने अखेर पालिकेच्या ताब्यात दिले

0
Spread the love

आम्ही काही चुकीचं केलं नाही व आम्हाला नोटीस व सील करण्यात येणार असल्याची माहिती नसल्याचे सांगणारे पालिकेकडे झाले सरेंडर.

ताबा तर दिला परंतु १ वर्षाचे १२ लाख ६० हजार रुपये भाडे थकीत.

पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी

कोंढवा खुर्द मधील अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉल हे फ्युचर फाउंडेशनला करारनाम्यावर ५ वर्षासाठी चालवण्यासाठी महानगर पालिकेने दिले होते. फ्युचर फाउंडेशनने ताबा घेतल्यापासून वादात सापडले होते. त्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. आरोप काही संपेना, तर पालिकेने वारंवार पत्रव्यवहार करून खुलासा मागितला होता. परंतु खुलासा हा फक्त फाईल बंद मध्ये राहून जायचा. यात अनेकांनी पाठपुरावा करून अखेर ते मार्गी लावलेच आहे. फाउंडेशनवर अनेक गंभीर आरोप लावले जात होते.

पालिकेने केलेल्या करारानुसार सदरील संस्थेला अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉल हा लग्न समारंभासाठी भाड्याने देऊ नये अशी अट घातली होती. परंतु संस्थेने ती अट धुडकावून लावत सकाळी-संध्याकाळी भाड्याने २५ हजार रुपये प्रमाणे देणे सुरू केल्याची तक्रार पालिकेकडे येऊ लागल्या होत्या.

त्यावर पालिकेने पत्र देऊन हॉल ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतीत पुणे सिटी टाइम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याला खुलासा करत संस्थेच्या अध्यक्षाने एक व्हिडिओ प्रसारित करून सदरील बातमी खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले होते. अखेर स्वतःहून हॉलचा ताबा पुणे महानगर पालिकेकडे जमा केल्याने आता संस्थेच्या अध्यक्षा खोट्या ठरल्या आहेत.

 

मागील बातमी }}  पुणे : “नियम फक्त कागदावर! करार रद्द झालून एक वर्ष उलटले, तरी कोंढव्याचा अबु हनीफा हॉल फ्युचर फाउंडेशनकडेच; लग्न समारंभ चालूच”

अधिकाऱ्यांनी ३ वेळा अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉलला सील करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.

समाज विकास विभागाने ३ वेळा हॉलचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी वारंवार गोंधळ, शिवीगाळ होत असल्याने अधिकारी माघारी फिरले. त्यावेळी पोलिसांना पोलिस बंदोबस्त पुरवावा म्हणून पत्रव्यवहार केला होता. परंतु पोलिसांनी मदत केली नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर एका नगरसेवकाने वारंवार त्या संस्थेला पाठिशी घालून पालिकेत येऊन राडा घातल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हॉलचा ताबा दिला परंतु १ वर्षांचा भाडा थकीतच

दर महिन्याला फ्युचर फाउंडेशनला १ लाख ५ हजार रुपये भाडे होते. तर गेल्या मे २०२५ पासून ते मे २०२६ पर्यंत भाडे १२ लाख ६० हजार रुपये दिले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु ताबा घेताना अधिकारी व कर्मचारी झोपा काढत होते का? ताबा घेताना थकीत भाडे घेतलं नसल्याचे समोर आले आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की आता समाज विकास विभागाचे अधिकारी पैसे वसूल करण्यासाठी उंटावर बसून कागदोपत्रीचा खेळ खेळत बसणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांकडून लाखो रुपयांची वसुली परंतु संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही?

पालिकेच्या करारनाम्यानुसार संस्थेने कामकाज न करता सकाळी-संध्याकाळी हॉल भाड्याने घेऊन लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे. तर याबाबत समाज विकास विभागाकडे सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान यांनी पुरावे देखील दिले आहेत. परंतु पालिकेने फक्त सील व ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. गुन्हा दाखल केलेला नाही. या ऐवजी सर्व सामान्य माणसाने अशी लूट केली असती तर समाज विकास विभागाने तात्काळ गुन्हा दाखल करून इतिहासात नाव कोरले असते. परंतु नगरसेवकाचे पाठबळ व समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची कृपा असल्याने असे प्रकार घडत आहेत. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here