समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, पुण्यातील नाना पेठेतील एकाने ३ पहाडी पोपट, १२३ बजरी जातीचे लव्हबर्ड बेकायदेशीरपणे ठेवल्या प्रकरणी एका विरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नाना पेठेतील पेशंनवाला मशिद समोर रेशम हाऊस या इमारतीचे टेरेसवर रहेमतुल्ला शौकतउल्ला खान याने अनाधिकाराने,विनापरवाना, बेकायदेशिरित्या पहाडी पोपट व लव्हबर्डस विक्री करीता ठेवलेले आहे.
अशी खबर मिळाल्याने पोलीसांनी महाराष्ट्र वन विभागाला माहीती दिलीव तेथील वनरक्षक काळुराम कोंडीबा कड, रा. इंद्रायणीनगर, भोसरी पुणे यांचे मदतीने घर नं. ४२८ रास्ता पेठ,पेशंनवाला मशिद समोर छापा टाकला.
त्यावेळी बिल्डिंगच्या टेरेसवर रहेमतुल्ला शौकतउल्ला खान, वय – ५७ रा घनं ४२८ रास्ता पेठ, यांनी एकुण ३ पहाडी पोपट व १२३ बजरी जातीचे लव्ह बर्डस अतिशय निर्दयीरित्या जाळीचे पिंज-यात कोंबुन भरलेल्या अवस्थेत पक्षांच्या जिविताची योग्य ती खबरदारी न घेता व कोणत्याही सक्षम अधिकरी यांचा परवाना न घेता ठेवलेले आढळुन आल्याने ताब्यात घेण्यात आलेले आहे.
त्या पक्षांची किंमत अंदाजे २ लाख ३ हजार असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत अमुल्य आहे.रहेमतुल्ला शौकतउल्ला खान यांना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
ताब्यात घेण्यात आलेले पक्षी सुरक्षीतेसाठी रेस्क्यु वाईल्ड लाईफ टीटीएस (ट्रिटमेंट ट्रान्झीस्ट सेंटर) यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.पहाडी पोपट व बजरी जातीचे लव्हबर्डस कोठुन आणले आहेत व ते कोणाला देणार होता तसेच त्याने आणखी वन्यजीव पक्षी व प्राणी बेकायदेशीर जवळ बाळगुन कोठे लपवुन ठेवले आहेत अगर कसे ? त्याचे इतर कोणी साथीदारांचा गुन्हयात सहभाग आहे अगर कसे? तसेच त्यांची अशाप्रकारे बेकायदेशीररित्या वन्यजीव (प्राणी व पक्षी ) ची खरेदी व विक्री करण्याची आंतरराज्य संघटीत टोळी आहे काय ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अजय जाधव, अय्याज दडडीकर, इम्रान शेख,अशोक माने, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.