कात्रज तलाठ्यांची अशी ही बनवाबनवी उघड, महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी.

0
Spread the love

कोंढव्यातील अवैध गौण खनिज संदर्भात फक्त एकच अहवाल सादर.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी, कोंढव्यातील अवैध गौण खनिज उत्खननाची कारवाईची मागणी जोर धरू लागली असली तरी वरिष्ठांकडून कामचुकार कनिष्ठांवर कारवाईचा जोर धरला जात नसल्याने थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्याचे प्रधान सचिवांकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हकीकत अशी की पुण्यातील उपनगर परिसर कोंढवा येथील अवैध गौण खनिजाची पोल खोल अजहर खान यांनी केली होती. त्या संदर्भात ३ डिसेंबर २०२१ रोजी तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी कात्रज तलाठी अर्चना वनवे यांना पत्र काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु त्या अहवालावर अद्यापही कात्रज तलाठ्यांनी पूर्णपणे खुलासा केलेला नसला तरी ३ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रावर फक्त आणि फक्त एकच बनवाबनवीचा खुलासा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्र काढून ७ दिवसांत खुलासा मागितला होता. कात्रज तलाठ्यांनी खुलासा हा १५ फेब्रुवारीला २०२२ ला दिला असून, ७ ठिकाणचे पंचनामे सादर करण्या ऐवजी त्यात फक्त एकच “इनसिनिगीया प्रो.प्रा.ली.” सर्वे नंबर ४६ यांच्या जमिनीत गौण खनिज उत्खनन झाल्याचे म्हटले आहे.

परंतु अहवाल सादर करताना त्यात किती ब्रास उत्खनन झाले आहे याचा देखील उल्लेख केलेला नाही.मग अहवाल हा अर्धवटरावा सारखे पाठवायचे कारण काय? तलाठी अर्चना वनवे यांनी अर्धवट अहवाल पाठविले तर तहसिलदारांच्या निर्दशनास आणून देण्याची जबाबदारी संबंधित क्लार्कची नाही का?

त्या क्लार्क कडून महिनो महिने अहवाल दळवून ठेवण्याचे कारण काय? अश्या किती कर्मचाऱ्यांच्या अहवाल, चौकश्या, तक्रारी अर्ज त्या महिला कर्मचाऱ्यांकडे प्रलंबित असेल?

असे अनेक प्रश्न खान यांनी महसूल मंत्री व प्रधान सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बनवाबनवी करणा-या तलाठ्यांवर व त्यांना पाठिशी घालणा-या महिला क्लार्कवर त्वरित कारवाईची मागणी खान यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here