पुणे सिटी टाईम्स इम्पॅक्ट बोपदेव घाटातील ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्का पुरवला जात होता; पोलिसांचा छापा, हॉटेल सील

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

सासवडजवळील बोपदेव घाटातील ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्का पुरवला जात असल्याची धक्कादायक बातमी शनिवारी आणि मंगळवारी पुणे सिटी टाईम्सने प्रसिद्ध केली होती.या बातमीनंतर सासवड पोलीसांनी रेस्टॉरंटवर छापा टाकला. छाप्यावेळी अल्पवयीन मुले हुक्का ओढत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे पोलीसांनी ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटला ताबडतोब टाळे ठोकल्याची माहिती मिळाली आहे.

मागील बातमी }}}. pune | बोपदेव घाटातील ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्का: हर्बलच्या नावाखाली तंबाखूचा विषारी धूर!

अल्पवयीन मुलांना खुलेआम हुक्का पुरवला जात असताना पोलीस यंत्रणा काय करत होती, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, पुणे सिटी टाईम्सने ही बातमी प्रकाशित करून प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत.

 

आताही तुमच्या आसपास कुठे हुक्का पार्टी रंगत असेल, तर पुणे सिटी टाईम्सच्या व्हाट्सॲप नंबर 9881433883 वर कळवा. नक्कीच वाचा फोडण्यात येईल आणि तुमचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here