बोपदेव घाटातील ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्का: हर्बलच्या नावाखाली तंबाखूचा विषारी धूर! सासवड पोलिसांच्या हद्दीत उघडउघड चाललेली हुक्का पार्टी; वसुलीच्या आरोपांमुळे खळबळ

0
Spread the love
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

शिक्षणाच्या माहेरघरात आज अल्पवयीन मुलांना हुक्का पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी लपूनछपून तर काही ठिकाणी उघडपणे हुक्का पार्टी रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वसुली बहादुरांमुळेच हे प्रकार घडत असल्याचा आरोपही होत आहे.

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे अल्पवयीन मुलांना हुक्का दिला जात असल्याचे समोर आले आहे. बोपदेव घाटातील ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्टी रंगत असल्याचे व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या हाती आले आहेत. पाहणी दरम्यान तेथे काही अल्पवयीन मुले हुक्का ओढत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.अशा लहान मुलांना हुक्का देणाऱ्या ‘द फॉरेस्ट’ रेस्टॉरंटचा “आका” कोण, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या आक्यापुढे पोलिस यंत्रणा नतमस्तक झाली आहे का, कारण वारंवार कारवाई होऊनही हुक्का पार्टी रंगत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अधिक माहिती घेतली असता वसुली बहादुरांमुळेच हे प्रकार राजरोसपणे घडत असल्याने त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही, असे सांगितले जाते.या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप सिंग गील यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हर्बल हुक्क्याच्या नावाखाली तरुणाईची दिशाभूल…

अल्पवयीन मुलांना हर्बल हुक्क्याच्या नावाखाली नशा होणारा तंबाखूजन्य हुक्का पुरवला जातो. त्यामुळे अल्पवयीन मुलांना सवय लागत आहे. यामुळे येणाऱ्या पिढीला चांगलेच भोगावे लागणार आहे.

नशा कशाने आणि कशी होते?

निकोटीनची नशा: हुक्क्यात वापरल्या जाणाऱ्या तंबाखूत निकोटीन असते. झुरका मारल्यावर निकोटीन रक्तातून झपाट्याने मेंदूत पोहोचते आणि तात्कालिक आनंद किंवा नशेकडे नेणारी संवेदना निर्माण करते.

कार्बन मोनोऑक्साइडचा प्रभाव: कोळसा जाळून शीशा गरम केला जातो. त्यामुळे हुक्क्याच्या धुरात मोठ्या प्रमाणात कार्बन मोनोऑक्साइड निर्माण होतो, ज्यामुळे हलके वाटणे, चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा डोके जड होणे (नशासारखे फीलिंग) अशी लक्षणे येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here