वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत माथेफिरू मुलाने केला मुलीवर चाकूने हल्ला, पुण्यात उडाली खळबळ.

0
Spread the love

शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर सपासप केले वार.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत शिक्षण सुरू असतानाच एका तरूणीवर एका माथेफिरू तरूणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदरील शाळेत घबराट पसरली आहे.

इनामदार शाळेमध्ये निरोपसमारंभ सुरु असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून त्यावेळी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ सुरु होता. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला.

आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुलीवर वार केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पळून गेला
आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत. सदरील तरुणीवर माथेफिरू तरूणाने वार केल्याची माहिती इंडियन मुस्लिम फ्रंटचे गौस शेख यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here