दोनपेक्षा जास्त वाहतूक पोलीस रस्त्यावर थांबल्यास होणार कारवाई,

0
Spread the love

जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत करण्याचे ब्रॉडकास्टिंग (बीसी) द्वारे आदेश.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) “अजहर खान”
पुणे शहरातील वाहतूक जाम बद्दल आता काय सांगावे, जिथे तिथे वाहतूक ( traffic) जामचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. तर मार्च महिना सुरू झाला की वाहतूक पोलीस दंड वसूलीकडेच लक्ष केंद्रित करून साज शोधत असल्याचे पुणेकरांचे हे अनुभव आहेत.

तर जागोजागी घोळका करून तर काही ठिकाणी लपून छपून कारवाई केली जात आहे. अश्या कारवाईमुळे पुणेकरांमध्ये व वाहतूक पोलीसांमध्ये खटके उडत असल्याचे रस्त्यावर रोजचेच चित्र पाहायला मिळत आहे.

तसेच चुकिची कारवाई करून कोणाला वेठीस धरू नका असे
वरिष्ठांनी किती आदेश दिले तरी ते पायदळी तुडवून मनमानी वाहतूक पोलीस करत असल्याचेही अनेक उदाहरणे पाहिला मिळाली आहे.

या सर्वांचा बिमोड करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन आता वरिष्ठांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून वसूलीवर लक्ष केंद्रित करणा-या व चौकात दोनपेक्षा जास्त थांबणा-या अंमलदारांवर कंट्रोल रूमने ब्रॉडकास्टिंग द्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत.

एखादे प्रकार घडल्यानंतरच असे आदेश का काढले जातात?आता हे आदेश फक्त नावापुरतेच आहे का? का या आदेशानुसार कारवाई होणार? फक्त वेढ काढून नेण्यासाठी तर असे आदेश निघत नाही ना?

यापूर्वीही ब्रॉडकास्टिंगद्वारे असे आदेश देण्यात आले होते त्यानंतर किती वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात आली?असे अनेक प्रश्न पुणेकरांन समोर उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here