NCP च्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांची बदनामी केल्याप्रकरणी मनसेच्या १६ जणांवर गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांची सोशल मिडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. याप्रकरणी एडवोकेट पुनम काशिनाथ गुंजाळ वय २७ यांनी तक्रार दिली आहे.

नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भादवि भारतीय दंड विधान कलम ३५४/अ, ड, ५००,३४आयटी ऍक्ट क ६६ c ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्रोफाईलवर अॅड. रूपाली ठोंबरे यांचा फोटो दिसला.

विना परवानगी त्यांचा फोटो घेऊन त्याचा वापर करून अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेविषयी असतील भाषेत बोलू नका अशी विनंती केल्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here