तलाठी, मंडळ अधिका-यांचे का होतंय दुर्लक्ष?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, सध्या वाळू उपसा बंदी असताना देखील आज राजरोसपणे किरकोळ विक्रेत्यांकडून सरासपणे वाळू विक्री केली जात असताना तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाळू उपसा बंदी असताना सदरील वाळू येत आहे तरी कुठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर वाळू विक्रेत्यांकडून भर रस्त्यावर वाळू विक्री सुरू असताना देखील शासकीय यंत्रणा झोपी गेली आहे का? झोपेचे सोंग घेऊन कारवाईस दुर्लक्ष करत आहे.
बाहेरून वाळू विक्रीसाठी असो किंवा बांधकामासाठी त्यासाठी संबंधित तहसिलदारांची रितसर परवानगी घेऊन चलन भरावे लागते, परंतु असे कोणतेही चलन न भरता व परवानगी न घेता हडपसर मंडल अधिकाऱ्यांच्या हद्दीत राजरोसपणे वाळू विक्री सुरू आहे.
मंडल अधिकाऱ्यांचा तर या वाळू विक्रेत्यांना अभय नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसिलदार ( हवेली) कार्यालयातील अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात एकालाही वाळू विक्री व वाहतूकीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
अशी वाळू विक्री सुरू असेल तर ते अवैध समजण्यात येते, पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींने हडपसर येथील गुलाम अली नगर रेसकयू फाउंडेशन समोर १) महाराष्ट्र बिल्डिंग सप्लायर्स,२) तानाजी एंटरप्राजेस हांडेवाडी ईएसपी वास्तु सोसायटी समोर, ३) सिद्धेश्वर ट्रेडर्स गणेश नगर महमंदवाडी कृष्णा नगर जवळ, ३) अकबर बिल्डींग मटेरियल सप्लायर्स, गणेश नगर महमंदवाडी व इतर ठिकाणी पाहणी केली असता ५-६ ब्रास पेक्षा जास्त वाळू साठवणूक केल्याचे दिसून आली आहे. यामुळे वाळू विक्रीचा प्रकार समोर आला आहे.
हडपसरच्या हद्दीत अनेक ठिकाणी वाळू विक्री सुरू असताना व शासनाचा महसूल बुडत असताना देखील वरिष्ठांपासून ते मंडल अधिकारी व तलाठी पर्यंत सर्वांचे यात दुर्लक्ष होत असल्याने वाळू विक्रेते गलेलठ्ठ झाले आहे.
यात मंडल अधिकारी व तलाठ्यांची मिलीभगत तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. राजरोसपणे रस्त्यावर विकली जाणारी वाळू नागरिकांच्या डोळ्यातून दिसत आहे परंतु काळा चष्मा लावून बसलेल्या मंडल अधिकारी व तलाठ्यांना मात्र हे दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून मंडल अधिकारी व तलाठ्यांची चौकशीची मागणी पुणेकरांकडून होत आहे. क्रमशः