पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.
कोंढवा : बोगस कागदपत्राद्वारे जमीन बळकावणाऱ्या आणि दुसऱ्याकडे अदलाबदल करणाऱ्या मुरलीधर दत्तोबा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी स्वीकृत नगरसेवक संजय मुरलीधर लोणकर, दादा मुरलीधर लोणकर व नोबेल होम्स चे भागीदार अब्दुल तय्यब करेश बेहरेनवाला यांचा वर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादींनी न्यायालयात धाव घेतली होती.
मुरलीधर लोणकर यांनी लुकमान खान, कासम शेख, शालूताई बुद्धीवंत व सुभाष गोयल यांना १९९६ साली खरेदीखत करून दिले होते व खरेदी वर ताबा ही दिलेला होता. ते खरेदीखत रद्द न करता खोटे व बोगस कागदपत्राचे आधारे स्वतः चे नाव ७/१२ वर २०१९ साली लावून स्वतःचा मुलगा संजय लोणकर व दादा लोणकर यांचे नावे केली.
सदर मिळकतीला लागून असलेले बिल्डर नोबेल होम्स चे भागीदार अब्दुल तय्यब करेश बेहरेनवाला यांना अदलाबद्दल दस्ताने हस्तान्तरण करून फिर्यादी लुकमान खान यांची फसवणूक केली आहे.या प्रकरणात खान यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी टाळाटाळ केल्याने खान यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने कलम १५६/३ अन्वये त्यांचे विरुद्ध IPC भारतीय दंड संहिता कलम ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश २८ जुलै २०२३ पोलिसांना दिले आहेत. या आदेशाची सर्टीफाईड प्रत शुक्रवारी,४ ऑगस्ट २०२३ रोजी खान यांना मिळाल्याने त्यांनी सोमवारी ७ ऑगस्ट रोजी प्रसिध्दीपत्रक प्रसिद्धीस दिले.एड.सुधीर एस. पोतले यांनी लुकमान खान यांची बाजू न्यायालयात मांडली आहे.