पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील अप्पर पोलिस आयुक्तांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सायबर भामटय़ांनी टार्गेट केले आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॉक केल्याने कोणत्याही मजकूरास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन टास्कचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या घटना घडत आहेत. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यातच आता सायबर चोरट्यांनी चक्क गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पोकळे यांच्या नावाने काही परिचित, नागरिकांना चोरट्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे समोर आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे. तसेच त्यास प्रतिसाद देऊ नये असे आवाहन नागरिकांना केले आहे.
रामनाथ पोकळे निरीक्षकाच्या नावाने चोरट्यांनी त्यांच्या पुतणीला मेसेजपाठवून सायबर फसवणूक केली होती. अशा घटनांमळे नागरिकांप्रमाणे पोलिसांची सोशल मीडियावरील खाती देखील सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे.