पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
मुंढवा- कोरगोव पार्क रोडवरील वॉटर्स बार अँन्ड किचन या हॉटेल्स मध्ये तोडफोडीची घटना घडली असून, ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखिल मेदनकर वय ३२ वर्षे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या फिर्यादीवरून भादविक ३२४, ३२३,४२७,५०४,५०६, १४३.१४७,१४९ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री दिड वाजता मुंढवा- कोरगोव पार्क रोडवरील वॉटर्स बार अॅण्ड किचन या हॉटेल मध्ये फियादी हे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत असुन काही हॉटेल्स मध्ये ते वेग-वेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचे काम करतात. वॉटर्स हॉटेल अॅण्ड बार किचन या हॉटेल मध्ये कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्या ठिकाणी हॉटेलची पार्टी चालु असताना, त्यावेळी फिर्यादी तेथे हजर असताना, हॉटेल मालकाने नमुद हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने त्यांचे हॉटेल बंद करीत असताना,त्याचा राग यातील आल्याने त्याने जोर-जोरात ओरडुन, गोंधळ घालुन,त्याचे इतर साथीदारांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन, त्या सर्वांनी हॉटेल मधील सामानाची तोडफोड केली.
तसेच मुळ मालक व त्यांचा मावस भाऊ यांना शिवीगाळ करून,धमकी दिली. तसेच हॉटेलचे बाऊंसर यांना मारहाण करून,नमुद हॉटेलचे गि-हाईक व महिलांना तेथील खुर्च्याने व हाताने मारहाण केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक, आर.व्ही. महानोर करित आहे.