हडपसर सय्यद नगर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टचे शफी इनामदार त्यांचे दोन मुले आणि दोन मुख्याध्यापका विरूध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

शाळेचे अनधिकृत बांधकाम प्रकरण भोवले.

शफि इनामदार विरोधात तिसऱ्यांदा गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे शहरात अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहिले असून पुणे महानगर पालिकेने आता कारवाईचा फार्स आवळला आहे. पुणे हडपसर गुलामअली नगर येथील सर्वे नंबर ७३ मध्ये एकुण ४ मजल्यांचे अनधिकृत बांधकाम करून आयडियल ऐजुकेशन ट्रस्ट मार्फत त्यात शाळा चालवली जात आहे.

पुणे महानगर पालिकेतील कनिष्ठ अभियंता भूषण सोनवणे यांनी पाहणी करून संबंधित ट्रस्टच्या संचालकांना नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते.

परंतु कागदपत्रे सादर न केल्याने सोनवणे यांनी पुन्हा दुसरी नोटीस बजावली, त्यांचा प्रतिसाद न आल्याने कनिष्ठ अभियंता भूषण सोनवणे यांनी एम.आर.टी.पी कायदा १९६६ चे कलम ४३ सह कलम ५२ अनयवे वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीची दखल घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कलम ५२ प्रमाणे आयडिल ऐजुकेशन ट्रस्ट चेअरमन १) शफि यासिन इनामदार, २) शोएब शफि इनामदार, ३ ) डॉ. मुसददीक शफि इनामदार, व दोन मुख्याध्यापक असे ५ जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पूर्वीही शफि यासिन इनामदार विरूद्ध सय्यद नगर येथील अनधिकृत बांधकामे केल्याचे २ गुन्हे वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांच्यावर तीसर-यांदा गुन्हा दाखल झाल्याने हडपसर भागात चर्चेला उधाण आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोटावडे हे करीत आहेत.अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here