लग्न करुन पत्नीला सोडून पळून गेलेल्या पती विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल.

0
Spread the love

नणंदेची केस कोर्टात चालू असताना वकिलाला व कोर्टात येणाऱ्या खर्चासाठी पत्नीच्या घरच्यांकडे लाखांची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी, नणंदेची केस कोर्टात चालू असताना वकिलाला व कोर्टात येणाऱ्या खर्चासाठी पत्नीच्या घरच्यांकडे कडे लाखांची मागणी करून व इतर प्रकारे त्रास देणाऱ्या सरासरीच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या एका वर्षातच त्रास देण्यास सुरुवात केली होती. शाहरुख फारुख शेख ,फरीदा फारुख शेख ,शोएब फारुख शेख फरीन फय्याज शेख , मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाहरुख शेख हा काहीएक कामधंदा करीत नव्हता.तसेच शाहरूखच्या लग्नाचा खर्च मोठ्ठा झाला म्हणून ते फेडण्यासाठी फिर्यादीकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते.

फिर्यादीचे वडिल देत होते . तरी देखील आरोपी फिर्यादीचा भयंकर प्रकारे मानसिक ,शारिरीक व आर्थिक छळ करु लागले . फिर्यादीला पैशांसाठी ब्लॅकमेलिंग करायला लागले . फिर्यादीच्या घरच्यांनी आरोपीला पैसे दिले नाही म्हणून आरोपी शाहरुख शेख हा फिर्यादीला सोडून पळून गेला .

जोपर्यंत फिर्यादी पैसे देत नाही तोपर्यंत आरोपी शाहरुख हा समोर येणार नाही अशा धमक्या फिर्यादीला व फिर्यादीच्या घरच्यांना देत आहे . म्हणून फिर्यादी यांनी वकिल साजिद ब .शहा व वकिल अमित मोरे यांच्या मार्फत सबंधित पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी तक्रारीवर दखल न घेतल्याने फिर्यादी यांनी वकिल साजिद ब शाह यांच्या मार्फत लष्कर न्यायालयात केस दाखल केली होती.

न्यायालयाने सर्व आरोपी विरोधात भा.द.वि कलम ४ ९ ८ ए , ४०६ , ४१ ९ , ४२० , ३२३ , ५०४ , ५०६ ( २ ) , ३४ खाली कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वकिल साजिद शहा यांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here