पुण्यातील त्या पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्याची वरिष्ठांना अजबच मागणी ! अख्खं पोलीस ठाणे हैराण,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी, पुण्यातील एका पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठांनि पत्र देऊन सुट्टीसाठी अजब मागणी केल्याने, त्या पत्राची चर्चाच- चर्चा रंगली आहे.

एका पत्राद्वारे सुट्टीचं हटके कारण पुढं आलं आहे. वरिष्ठांना लिहीलेलं हे पत्र वाचून तुम्हीही हैराण व्हाल. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सुट्टी हवी होती.

मग वरिष्ठांना पोलीस कर्मचाऱ्यान रितसर पत्र लिहीलं. मात्र सुट्टीसाठीचं कारण वाचून वरिष्ठही चक्रावले आहेत.आपल्या सहकाऱ्यांसाठी चिलापी आणि रव मासे घेऊन खायचे आहेत, त्यासाठी दोन दिवस सुट्टी द्यावी असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एस.डी.शिंदे यांनी हे पत्र लिहिलं आहे.सोलापूर येथून हे मासे आणायचे असल्यानं साप्ताहिक सुटीला जोडून एक सुट्टी द्यावी अशी विनंती या पत्रात शिंदे यांनी वरिष्ठांना केली आहे.पोलीस हवालदाराच्या या पत्राची चर्चा सध्या पोलिस ठाण्यात चांगलीच रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here