फसवणूक केल्याप्रकरणी महिला वकिलासहित इतरांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
करारनामा न करता व रजिस्ट्रेशन न करता फसवणूक केल्याप्रकरणी महिला वकिलासहित इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपनी बरोबर जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. गुंतवणुकीसाठी रजिस्ट्रेशन फी म्हणून ५० टक्के रक्कम मागितली. ती दिल्यानंतर त्याने व्यवहार पूर्ण केल नाहीच उलट रजिस्ट्रेशनसाठी दिलेली रक्कम परत न करता फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सुधाकर मधुकर कदम (वय ५२, रा. संभाजीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद गु.रजि.नं. ५५६ /२२ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपक अगरवाल आणि त्यांच्या वकिल ॲड. मनिषा राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दीपक अगरवाल यांच्या लक्ष्मी फायनान्स लि. इन्व्हेस्ट या कंपनीसोबत फिर्यादीचे गावी भुईज येथील ५ आर क्षेत्रातील एकूण १५ हजार ६०० स्क्वेअर फुट बांधकाम २ हजार ३०० रुपये स्क्वेअर फुटाने विक्रीचा व्यवहार ठरला होता.

फिर्यादी यांना गुंतवणुकीचे करारनाम्याची प्रत दीपक अगरवाल यांनी पाठविली. त्यावर ३ टक्के रजिस्ट्रेशन फीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ५ लाख ४५ हजार १०० रुपये देण्यास अगरवाल यांनी सांगितले. ती
रक्कम त्यांनी अगरवाल यांचे वकिलांच्या एमडीआर कंन्सल्टट अॅड मनिषा राणे यांच्या खात्यात नोव्हेंबर २०२० मध्ये आर टी जी एस केली.

ठरल्याप्रमाणे दीपक अगरवाल याने बिल्डिंगचा व्यवहार पूर्ण केला नाही. भरलेली रजिस्टेशन फी परत न करता फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here