पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
खडकी बाजारात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे.खडकी बाजारातील मेहता बिल्डींग जवळील सुभानअल्ला सायकल मार्ट समोरील कोप-याला बेकायदेशीरपणे मटका जुगार घेत असलेबाबत माहिती मिळाली होती.
सदर ठिकाणी छापा टाकुन,पैशावर बेकायदेशीर मटका जुगार घेणारे व मटका जुगार खेळणारे १० जण मिळुन आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम ४९ हजार ९५० रूपये घटना स्थळावरून जप्त केले आहे.
१० इसमांविरूध्द खडकी पोलीस ठाण्यात गुरनं.१६५/२०२२,महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता खडकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार, प्रमोद मोहिते, अजय राणे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे व महिला पोलीस अंमलदार, मनिषा पुकाळे या पथकाने यशस्वी केली आहे.