काम खडक पोलीस ठाण्यात तर मारहाण मंडई पोलीस चौकीत.
३३७,३२३,५०४ प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यात एका महिलेला पोलीसाने मारहाण केल्याची घटना पुणे शहरात घडली होती. त्याचे पडसाद पुणे शहरात उमटले होते. तर सोशल मीडियावर नेटजिंगनी पोलीसांचा चांगलाच समाचार घेतला होता.
तर १५ दिवस त्या पोलीसाविरूद्ध गुन्हा दाखल न झाल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. काही कार्यकर्त्यांनी निवेदन देखील दिले होते. त्या अनुषंगाने खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाप्रकार मंडई पोलीस चौकीच्या शेजारी १९ ऑक्टोबर रोजी घडला होता.याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी कांचन दिपक दोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान,याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी राहूल शिंगे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत पाठपुरावा केला.
अखेर शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचे निलंबन केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. निलंबित पोलीस कर्मचारी राहूल शिंगे हा खडक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्यावर काल दि २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.