कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हया बाबतीत कॅम्पातील संपन्न हॉटेलचा काही संबंध नाही; हॉटेल मालकाचा खुलासा

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे कोंढवा पोलिस ठाण्यात शोएब अशफाक शेख व अशफाक दादूमिया शेख आणि इतरांवर कोंढवा पोलिस ठाण्यात ४९८,३५४ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. परंतु काही ठिकाणी कॅम्पातील हॉटेल संपन्न च्या मालकावर गुन्हा दाखल झाल्याचे बातम्या झळकले होते.

बातम्या वाऱ्या सारखे पसरल्याने हॉटेल संपन्न च्या मालकाला माहीत पडल्याने त्यांनी बातमीदारांना संपर्क साधून सर्व हकीकत सांगितले आहे. शोएब अशफाक शेख हा संपन्न हॉटेल मध्ये कामाला असून त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचा व हॉटेल संपन्नाचा काही एक संबंध नसून तो त्याचा वैयक्तिक विषय असल्याने आम्हाला त्यावर जास्त काही बोलायचे नसून हॉटेल मालक अतिक अंसारी असून माझ्या वर असे कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे संपन्न हॉटेलचे मालक अतिक अंसारी यांनी पुणे सिटी टाईम्स च्या प्रतिनिधीकडे खुलासा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here