पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील घटना ही २८ ऑगस्ट २०२३ रोजी, बी / ६४ / २२ सुवर्णयुग मित्र मंडळाचे मागे, सार्वजनिक रोडवर अप्पर इंदिरा नगर, बिबवेवाडी, येथे घडली आहे.या संदर्भात पोलिस अंमलदार राहुल कोठावळे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून गुन्हा र. नं १७८/२०२३, भादविक ३३२, ३२३, ३२४, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी हे रात्रपाळी कर्तव्या करीता पोलीस अंमलदार, केंद्रे यांचेसोबत मार्शलवर कर्तव्यावर पेट्रोलिंग करीत असताना, एक इसम दारु पिऊन गोंधळ करीत असुन, वाहने फोडण्याचा प्रयत्न करून, आरडा-ओरडा करत आहे. असा कॉल प्राप्त झाल्याने, फिर्यादी हे तात्काळ कॉल पाँईटला गेले असता, तो इसम संकेत साळुंके यास हाताने मारहाण करुन शिवीगाळ करीत असल्याने,फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवत असताना, सदर इसमाने फिर्यादी यांना तुम्ही आमच्या मध्ये पडु नका, मी काय करायचे ते बघुन घेईल,
आमच्या मध्ये आला तर खुप अवघड जाईल असे म्हणुन त्याचे खिशातील चाकु काढुन, फिर्यादीवर यांचे डाव्या तळ हातावर वार करून त्यांना दुखापत केली आहे. त्याचवेळी त्याने संकेत याच्या गालावर व काना जवळ चाकुने वार करुन त्यास जखमी करुन, फिर्यादी हे त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना,त्यांना धाकाने परावृत्त करुन, त्याचेकडील चाकुने इच्छापुर्वक दुखापत केली. फिर्यादी व संकेते साळुंके,वय- २८ यांस जखमी केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण देशमुख करित आहे.