पालिकेने लावला कारवाईचा धडाका.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
एफसी रोडवरील हॉटेल वैशाली तसेच क्वीन्स शॉप स्टोरीवर बांधकाम विकास विभाग झोन ६,या विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सुमारे ३ हजार ५०० चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी अँगल, ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड. चा समावेश आहे.

वैशाली हॉटेल मधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड काढण्यात आल्या. यावेळी हलवता येणारे ओनिग शेडही गॅस कटर ने कापुन काढण्यात आले.

कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट च्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली.

यापुढेही कारवाई चालू राहणार आहे तसेच जर पुन्हा शेड उभारली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सुनिल कदम उप अभियंता यांनी सांगितले आहे.
