कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार निलेश पालवे,स्वप्निल शिवरकर, तानाजी देशमुख यांनी केले.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.
मुंढवा पोलीस ठाणे, येथे नागरिकांची सुरक्षितता व पोलीसांचे आरोग्याकरीता मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णु ताम्हाणे यांचे संकल्पनेतून पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग,पोलीस उपआयुक्त, विक्रांत देशमुख,सहा.पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग,स्थानिक उद्योजक व नगरसेवक.उमेश गायकवाड व इतर नागरिक तसेच लोणी काळभोर, हडपसर, वानवडी पोलीस ठाणेंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणेस असे असे उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम मुंढवा पोलीस ठाणेस आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णु ताम्हाणे यांनी केले. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये पोलीस आयुक्त यांनी पोलीस स्टाफचे शारिरीक तंदुरुस्तीकडे व गुन्ह्यांना प्रतिबंध करून नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणेबाबत सुचना दिल्या होत्या. यांनी दिलेल्या सुचनातुन मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत सायकल पेट्रोलींग करणे बाबतची संकल्पना सुचली. त्यांनी सायकल पेट्रोलिंगची कल्पना पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना सांगितली व चर्चा करून सायकल पेट्रोलिंगबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
प्रास्ताविकनंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा यांचे हस्ते सायकल पेट्रोलिंग शुभारंभ उद्घाटन कार्यक्रम पार पडला आहे.सदर कार्यक्रम आयोजन मुंढवा पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार निलेश पालवे,स्वप्निल शिवरकर, तानाजी देशमुख व इतर पोलीस ठाणे स्टाफ यांनी केले आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, गल्लीबोळाचे रस्ते असतात. त्यामुळे गस्त घालताना पोलिसांच्या वाहनांना मर्यादा येतात. या पाश्र्वभूमीवर सायकलवरून गस्त घालणे सोपे होणार आहे.गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसाकडून काही अंतर सायकल चालविली जाणार आहे. परिणामी पोलिसाचे आरोग्य चांगले राहण्यास देखील मदत होणार आहे.शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरुंद रस्ते वाहतूक कोंडीचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत गल्ली बोळात सायकल गस्त (पेट्रोलिंग ) घालणार आहेत.
यामुळे पोलिसांच्या शारिरीक तंदरुस्तीबरोबरच नागरिकांसोबत अधिकाधिक संपर्क आल्यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सायकल पेट्रोलींग हे पर्यावरण पुरक असल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळले जाईल. या उपक्रमाकडे नागरिकांनी देखील कुतूहलाने पाहून देखील सायकलिंग करणे करीता पेरित होतील.