पुणे शहरातील त्या पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक; पोलिस दलात खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने लाच स्वीकारली म्हणून पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात सदरील प्रकार घडला आहे. पोलिस उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे वय ४४, असे लाच घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर कुंभारे हे विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्याकडे तक्रारदार यांच्याविरूध्दच्या तक्रारी अर्जाची चौकशी देण्यात आली होती.तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी पीएसआय शंकर कुंभारे यांनी तक्रारदाराकडे सुरूवातीला ५० हजारांची लाचेची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक शंकर कुंभारे यांनी तडजोडीअंती ३० हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. त्यापैकी १५ हजार रूपयाची लाच घेताना शंकर कुंभारे यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

त्यांच्याविरूध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करणात आल्याचे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here