कोंढवा भाग्योदय नगर-मिठानगर परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन; तहसील कार्यालयाचे मात्र दुर्लक्ष. लाखो रुपयांची रॉयल्टी बुडविला जात असल्याचा प्रकार

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील कोंढवा भागात अवैध गौण खनिज उत्खननाचे पेव फुटले असले तरी वरिष्ठ अधिकारी आणि तलाठी, मंडल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. लाखो रुपयांचा चुना शासनाला लावला जात असताना, देखील निगरगट झालेले अधिकारी याकडे पाठ फिरवून मलिदा चकत असल्याची चर्चा कोंढवा मिठानगर परिसरात सुरू आहे. सर्वे नंबर ४९/५० भाग्योदय नगर किड अॅन्ड किड्स शाळे शेजारी अवैध गौण खनिज चालू आहे.

कोंढवा मिठानगर गल्ली नंबर ४ मध्ये इकबाल नावाच्या बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरू केले आहेत.

सदरील तीनही ठिकाणी बांधकाम करताना तहसीलदार कार्यालयाची परवानगी न घेता अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवून, एक प्रकारे शासनाच्या तिजोरीवर दरोडाच घातला आहे?

अश्या लोकांवर तहसील कार्यालय ( हवेली) कारवाई करण्यास कुचराई करत आहेत. पुणे सिटी टाईम्सने अधिकृत सुत्रांकडून माहिती घेतली असता, अशा कोणत्याही प्रकारची गौण खनिज उत्खननाची परवानगी अथवा चलन देखील भरलेले नसून लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाईल.

तर असे अवैध गौण खनिज उत्खनन चालू असताना दुर्लक्ष करणाऱ्या तलाठी, मंडल अधिकारी व बांधकाम व्यावसायिक याच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

” दुपारी काम सुरू असल्याने कानठळ्या वाजत असल्याची तक्रार? “

बांधकाम व्यावसायिकाकडून कोणते नियम पाडले जात नसून दुपारी-रात्री काम करून कानठळ्या वाजत आहे. आजूबाजूच्या परिसरात लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक झोपलेले असताना देखील काम लवकर करण्याच्या भानगडीत आमच्या कानठळ्या वाजत असून लवकरच काम बंद पाडणे संदर्भात पुणे महानगर पालिकेला तक्रार करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

” अवैध बांधकामासाठी नागरिकांकडूनच वसुली केला जातोय पैसा? ”

बांधकाम करत असताना बुकिंगच्या नावाखाली नागरिकांकडूनच रक्कम वसुली केली जात असून,मात्र नागरिकांना च बांधकाम अधिकृत आहे का? अनाधिकृत हेच कळत नसल्याने, अवैधरित्या बांधकाम करत असताना यात बिल्डरचा काही नुकसान नसून बुकिंग दरम्यान रक्कम दिलेल्या नागरिकांनाच याचा फटका बसणार आहे. यात तिळमात्र शंकाच नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here