शेजारी राहणाऱ्या महिलेचा फोटो अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस,

0
Spread the love

त्याच्या मोबाइलमध्ये तब्बल ४० हजार अश्लील व्हिडीओ आणि ५ हजार फोटो सापडले.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, सध्या इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.इंटरनेटच्या माध्यमातून मोबाइलवर विविध प्रकारचा व्हिडीओ कंटेंट बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात विशेषत: अश्लील फोटो, व्हिडिओ म्हणजेच पॉर्न कंटेंट बघण्याच्या व्यसनात बरेचशे लोक अडकले आहेत.

एका तरुणानं शेजार-पाजारी राहणाऱ्या महिलांचेच फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी वापर केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय शुभम आवाडे नावाच्या तरुणाला अटक केली असून, त्यानं त्याच्या शेजारच्या महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून पॉर्न व्हिडीओ बनल्याचं उघड झालं आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून तो असे पॉर्न व्हिडिओ बनवत असल्याचं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे.

पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्ये तब्बल ४० हजार अश्लील व्हिडीओ आणि ५ हजार फोटो सापडले आहेत. आवाडे विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या कलम ३५४ (A), ४६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं खडकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितल आहे. हे व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर टाकले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी शुभम आवाडे याच्या ओळखीच्या व्यक्तीनेच तक्रार दाखल केली आहे. त्यानं सांगितलं की, ‘शुभम आणि मी अनेकदा बोलायचो. एकदा तो त्याच्या फोनवर काहीतरी दाखवत असताना, आमच्यापैकी अनेकांनी त्याची फोटो गॅलरी बघितली तेव्हा त्यामध्ये अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यातले काही फोटो त्यानं मॉर्फ केलेले असून, ते आसपास राहणाऱ्या महिलांचेच फोटो आहेत,

असं लक्षात आल्यावर आम्ही त्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं आम्हाला खोटं काहीतरी सांगितलं. आपले असे अश्लील फोटो पाहून महिलांनाही धक्का बसला नंतर शुभमच हा उद्योग करत असल्याचा खुलासा झाल्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

या परिसरातील एका रहिवासी महिलेनं सांगितलं की, जेव्हा तिनं आरोपीच्या मोबाइलमध्ये आपल्या मैत्रिणीचा फोटो पाहिला तेव्हा तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याला चांगलं ओळखणाऱ्या माझ्या एका मित्रानं मला याबद्दल सांगितलं होतं. शुभम यानं सोशल मीडिया अकाउंटवरून त्या मुलीचा फोटो घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here