नागरिकांना १४४ धारा लागू मात्र हॉटेल पब वाल्यांना अभय का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील उच्चशिक्षित भागात लेटनाईट चालणा-या हॉटेल,पबकडून कोरोना नियमांची पायमल्ली केली जात असून पायमल्ली करणा-यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार नागरिकांना आव्हान करत असले तरी आज पुणे शहरातील शेकडो हॉटेल पब मध्ये कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.
एकीकडे मास्क वापरणे बंधनकारक केले असतानाही कल्याणीनगर मधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस मध्ये सर्वच्या सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना येरवडा पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे? हॉटेल युनिकॉर्न हाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पार्ट्या सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी युनिकॉर्न हाऊस मध्ये “लोहडी” या सणाची पार्टी जोमात झाली तर काल शनिवारी रात्री पार्टी जोमात पार पाडली,
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींच्या हाती आलेल्या व्हिडिओ मध्ये विना सोशल डिस्टन्स, विना मास्क, आणि मोठी गर्दी उसळलयाची व्हिडिओत दिसून येत आहे. आप आपल्या हद्दीत कोरोना नियमांची पायमल्ली व १४४ कलमांचे उल्लंघन होत आहे का? असे काही प्रकार घडत आहेत का? हे पाहण्याचे काम पोलिसांचे व महानगर पालिकेचे असताना दोघाही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे लेटनाईट पार्ट्या सुरू असून याच्याने कोरोना वाढत नाही का? का हे कोणत्या तरी मोठ्या हस्तकाचे हॉटेल असेल म्हणून कारवाई केली जात नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आज शासकीय कार्यालयात जायचे म्हणाले तर कोविड-१९ चे दोन डोस घेतल्यानंतर आत प्रवेश दिला जात असताना, मात्र युनिकॉर्न हाऊस मध्ये गर्दी करणा-यांमध्ये किती लोकांनी दोन डोस घेतले होते? त्याची तपासणी करणार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. खरं लेटनाईट चालणा-या हॉटेल, पार्ट्यांवर पोलीस आयुक्तांनी विषेश लक्ष केंद्रित करून यांची कुंडली तयार करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.या संदर्भात येरवडा पोलिसांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. क्रमशः