पुणे शहरातील बाणेर मधून अपहरण झालेला चिमकुला “स्वर्णम” पोलिसांना सापडला,

0
Spread the love

पोलिसांनी केली अभिनंदनीय कामगिरी. कौतुकाचा वर्षाव.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, काहि दिवसांपूर्वी पुणे शहरातील बाणेर मधून ४ वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. अपरहरणाची बातमी वा-या सारखी पसरली होती.

तर पोलीसांकडून कसून शोध घेतला जात होता. अखेर हा चिमुरडा पोलिसांना पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे सापडला. मागील आठवड्यात ४ वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती.

पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास तीनशे ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलाचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.

चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले ८ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता.

अखेर मुलाला ८ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here